जळगावात घराचे लाकडी साहित्य होळीत जाळले; टवाळखोरांविरोधात पोलीसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । होळीसाठी लागणारे लाकूड मिळून न आल्याने काही टवाळखोरांनी लाकडी पार्टेशनासह इतर वस्तू काढून होळीत जाळून टाकल्याचा प्रकार मंगळवारी १० रोजी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, रमेश शंकर गोपाळ (वय-३५) रा. हरीविठ्ठल नगर ह.मु. मुकुंदा नगर हे खासगी कार चालक आहेत. त्यांचा मुलगा दहावीत असल्यामुळे ते हरीविठ्ठल मधून मुकुंद नगर येथे कुटुंबासह गेल्या १ वर्षांपासून राहत आहे. हरीविठ्ठल नगरातील असलेल्या पार्टेशनचे दोन रूमचे घराला कुलुप लावलेले होते. सोमवारी ९ मार्च रोजी होळी असल्यामुळे रात्री ८ वाजता परीसरातील मनोज कोळी, भैय्या मिस्त्री, बंटी मिस्त्री, चेतन मिस्त्री आणि भुरा कोळी सर्व रा. हरीविठ्ठल नगर यांच्यासह इतर चार ते पाच जणांनी होळी पेटविण्यासाठी पार्टेशनचे लाकडी पाट्या, तीन दरवाजे, दोन प्लास्टीकच्या टाक्या, तीन प्लॉस्टिकच्या कॅन, कुलर आणि तीन दरवाजे तोडून होळीत जाळून खाक केले आहे. या घरात त्यांनी मुलगा अभ्यास करावा यासाठी त्यांचा स्मार्टमोबाईल देखील लपवून ठेवला होता तो देखील यांनी लंपास केला आहे. घडलेला प्रकाराबाबत शेजारी राहणाऱ्यांनी रमेश गोपाळ यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. आज सकाळी रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. रमेश गोपाळ यांनी मनोज कोळी, भैय्या मिस्त्री, बंटी मिस्त्री, चेतन मिस्त्री आणि भुरा कोळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content