जळगावात विवाहितेवर अत्याचार; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून होणारा त्रास कमी करण्याच्या बहाण्याने पुजाविधी करणाऱ्या व्यक्तीने गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडीत विवाहिता ही बिड जिल्ह्यात रहिवाशी असून तिचे व तिच्या पतीचे वाद होत होते. त्यामुळे जामनेर येथील करणी सेना तालुकाध्यक्ष रतन परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) यांच्‍याकडून किशोर सटवाजी जोशी (शास्त्री) रा. शिक्षक कॉलनी, जामनेर ह.मु. कासार मंगल कार्यालयाजवळ अयोध्या नगर, जळगाव हे पुजा व विधी करून त्रास कमी करत असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार डिसेंबर २०१८ मध्ये जळगावला परदेशी यांना भेटले. त्यानंतर सन २०१९ हे चांगले वर्ष असल्याचे सांगितल्यानंतर १ जानेवारी २०१९ रोजी रात्री ९ वाजता औरंगाबाद येथे पुजा करण्यासाठी किशोर जोशी यांनी औरंगाबाद येथील हॉटेल अतिथी येथे बोलावून कफी पिण्यासाठी दिली. त्यानंतर त्यांना गुंगी आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता जाग आल्याने आपल्यावर केलेल्या आत्याचाराबाबत पिडीतेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपी किशोर जोशी याने रात्री केलेल्या व्हिडोओ क्लिप दाखवून धमकी दिली. या व्हिडीओच्या आधारे त्याने मुबई, दिल्ली, बीड, जळगाव, इंदौर येथील हॉटेलामध्ये अत्याचार केला. त्यानंतर जळगावातील अयोध्यानगरातही दोघे एकत्र राहत होते. दरम्यान ९ मार्च २०२० रोजी त्यांचे नातेवाईकाशी मोबाईलवर बोलल्याचा राग आल्याने किशोर पाटील यांनी पिडीत महिलेला मारहाण करून घरातून हाकलून दिले. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी किशोर जोशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप हजारे करीत आहे.

Protected Content