प.वि.पाटील विद्यालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के. सी. ई. सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी सावित्री बोलते या विषयावरती मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील, कायनात सय्यद, मंगल गोठवाल यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content