विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात संपन्न

जळगाव,लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाउंडेशन जळगावच्या वतीने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे उत्साहात संपन्न झाली. यात ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

गांधी रिसर्च फाउंडेशन मार्फत दरवर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यानुसार  मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गांधी विचार संस्कार परीक्षा २०२२ आयोजित करण्यात आलेली होती. महात्मा गांधीजींच्या जीवन मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, गांधींचे विचार मुलांना समजावेत, यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे स्वतंत्र पुस्तक उपलब्ध होते. विद्यार्थ्यांची ६० गुणांची बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली. शाळेतील ९५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली पाटील यांचे सहकार्य लाभले. गांधी विचार संस्कार परीक्षेचे प्रमुख सचिन गायकवाड यांनी परीक्षेचे नियोजन केले. त्यांना आकाश शिंगाणे, दीपक सपकाळे, पुनम खर्चाने, दीपलक्ष्मी ठाकरे, मीना मोहोकर यांनी परीक्षा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Protected Content