जादा वजनाची वाहतुक थांबविण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील चोपडा भुसावळ राज्य महामार्गावर जादा वजनाची वाहतुक थांबवावी. जळगाव जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्वरित या विषयाकडे लक्ष द्यावे आणि या मार्गावरील वाढती वाहतुकीची कोंडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान चोपडा ते यावल भुसावळ या७० किलोमिटर लांबीच्या राज्य मार्गावरील रस्त्यावर मागील काही वर्षापासुन रस्त्याच्या वजन क्षमतेपेक्षा अधिक अवजड व कंटेनर वाहनांची मोठी वर्दळ वाढली असुन , सदरच्या या राज्य मार्गावर १०ते १२टन वजन क्षमतेचेच वाहन वाहतुक करू शकता पण गेली काही वर्षापासुन सतत १५ ते २० टन वजन क्षमतेच्या वाहनाच्या वाहनुकीमुळे हा मार्ग सिंक होत असुन, वारंवार रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत असुन या खड्यांमुळे अनेक वेळा अपघात होवुन अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहे. यावल सार्वजानिक बांधकाम विभागाची निष्क्रीयेता वेळ काढुपणा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्ष मुळे या घटनांमध्ये वाढ होत असुन तात्काळ या राज्य मार्गावरील वाढती अवजड वाहनांची व कंटेनरची वाहतुक थांबवावी अशी मागणी होत आहे.

 

 

 

Protected Content