सोसायटी सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज भरावं – गुलाबराव देवकर

जामनेर येथे विकास सोसायटी सदस्य व पदाधिकारी यांचा वसुली मेळावा संपन्न

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा बँक मजबूत करण्यासाठी व आपल्या गावातील वि.का,सोसायटी संस्था सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेवर भरावं असं आवाहन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांनी शेतकरी व संस्था संचालक मंडळ वसुली मेळाव्यात बोलताना केले.

जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी हॉलमध्ये जिल्हा बँक नाबाड वसुली मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषद सदस्य पती राजेश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँक मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र देशमुख, संदीप भैय्यासाहेब पाटील, जिल्हा बँक सदस्य नाना राजमल पाटील, भगवान पाटील, किशोर पाटील, जगन लोखंडे, बाबुराव गवळी, किशोर पवार, शंकर राजपूत, संदीप हिवाळे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी व विकास सोसायटी सभासद मेळाव्यात बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, “बँकेचं कामकाज करताना सचिव संचालक मंडळाने एकत्रित काम केलं पाहिजे. दोघं सोबत असले तर विकास सोसायटीचा काम योग्य प्रकारे होईल. कारण गावाचा विकास हा विकास सोसायटीवर अवलंबून असतो. जर संस्था मजबूत असली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज देता येते. विकास सोसायटी सहकारातील सगळ्यात महत्त्वाची संस्था असून आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्याचबरोबर संस्था चालवताना काटकसर करा. त्यामुळे सहसा कर्जबाजारी होणार नाही. आपण शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेत असून आता शेतकऱ्याला घेतलेले कर्ज भरावं लागणार आहे. त्यांच्याकडून कोणतेही प्रकारे व्याज घेतला जाणार नसून त्यामुळे आपण मुद्दल भरून आपल्या वसुलीचे प्रमाण वाढवा. जर आपण वेळेत कर्ज भरले तर आपल्याकडची कर्जही थकणार नाही व आपण कर्जबाजारी होणार नाही. सदर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करत आहे.” त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. “दर महिन्याला वि.का.सोसायटीची बैठक घेऊन विविध समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्र या.” असं आवाहन जिल्हा बँक संचालक रवींद्रभैय्या पाटील त्यांनी या बैठकीत केलं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.