Home Cities जळगाव मोठी बातमी : जळगाव महापालिका आयुक्तांची बदली, आदित्य जीवने नवे आयुक्त !

मोठी बातमी : जळगाव महापालिका आयुक्तांची बदली, आदित्य जीवने नवे आयुक्त !

0
212

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी युपीएससीच्या २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची जळगाव येथे नियुक्ती झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. आज यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणचे संयुक्त संचालक (जॉईंट डायरेक्टर) म्हणून कार्यरत असणारे आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०२१ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

दरम्यान, जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली नेमकी कुठे झाली ? हे स्पष्ट झालेले नाही. तर, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदलीच्या वृत्ताला दुजोरा देतांनाच प्रशासनाला अजून अधिकृतपणे याची माहिती मिळाली नसल्याचे नमूद केले.


Protected Content

Play sound