फायनान्स कंपनीच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याच्या तरुण मुलाने स्वतः व वडील कर्जबाजारी असल्याने विष पिऊन आत्महत्यात करण्याचा प्रयत्न रविवार दि. १२ जुन रोजी केला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना गुरुवार दि. १६ जुनच्या रात्री दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

कोरपावली येथील संजय ऊर्फ बाळू रमेश महाले (वय ३८) यांच्यावरती एका खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. तसेच त्याचे वडिलांवर देखील बँकांचे कर्ज आहे. या कर्जाचा डोंगर कसा पेलवला जाणार या विवंचनेत असताना संजयने त्याच्या राहत्या घरात रविवार दि. १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान आई वडील व कुटुंब जेवण करीत असताना निवांत त्यांना समजू न देता विष प्राशन करून आत्महत्याकरण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या हीबाब लक्षात आल्याने तात्काळ त्यास जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु, दुर्दैवाने त्याचा रुग्णालयात गुरुवार दि. १६जून रात्री मृत्यू झाला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. फायनान्स कंपनी सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असताना शेतकऱ्यांना कर्जफेड करता येत नसल्याने फायनान्स कंपन्या या शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांचा आर्थिक व मानसिक छळ करीत असुन , अशा प्रकारे फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करण्याची यावल तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. शासनाने तात्काळ अशा प्रकारे नागरीकांचा मानसिक व आर्थिक छळ करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Protected Content