जय योगेश्वर व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९६.४० टक्के निकाल

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एकूण ५० विद्यार्थी एसएससी परीक्षेला बसले असून या शाळेचा निकाल ९६.४० टक्के लागला आहे.

एसएससी परिक्षेत घनश्याम ठाकरे ९० टक्कांनी प्रथम तर मोक्ष देवरे ८९.४०% द्वितीय तर  प्रभूराज पाटील ८८.४०% तृतीय  क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे धनदाई माता एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील, सचिव राधेश्याम पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष बापूसो.के.डी पाटील संचालक शैलेंद्र पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या शाळेच्या प्रगती बाबत तालुक्यात व शहरात भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!