जळगाव विमानतळ घोटाळाप्रकरणी बड्या नेत्यांना अभय?

जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव पालीका अस्तीत्वात असतांना नगरपालीकेने राबविलेल्या वाघूर, विमानतळ, अॅटलांन्टा, तसेच जिल्हा बॅंकेशी संबधित आयबीपी योजनेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र भास्कर पाटील यांचे फिर्यादीवरून शहर तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात आजी-माजी नगरसेवक तसेच नगरध्यक्ष,महापौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान,या प्रकरणी जळगाव पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्यात दोन बड्या राजकीय नेत्यांना अभय मिळाल्याची जोरदार चर्चा आज सायंकाळपासून शहरात सुरु आहे.

या संदर्भात अधिक असे की, जळगाव महापालिकेतील विमानतळ घोटाळाप्रकरणी जळगाव पोलीसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तत्कालीन मनपा नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी सन २०१२ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार,सर्व आजी-माजी महापौर, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मागील काही दिवसांपासून औरंगाबाद खंडपीठात सुनवाई सुरु होती. पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही? अशी विचारणा देखील करत न्यायालयाने युक्तीवाद करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना न्यायालयाने दिले होते. स्व.नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात ऍड. एस.पी. ब्रह्मे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याप्रकरणी खंडपीठात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. जाधव यांच्यासमोर काही महिन्यांपूर्वी युक्तीवाद झाला होता. दरम्यान, फिर्यादी नरेंद्रअण्णा पाटील हे मयत झाल्यामुळे या खटल्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून अभय मिळालेले ते दोन बडे राजकीय नेते कोण? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Add Comment

Protected Content