बजरंग रेल्वे बोगद्याजवळून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बजरंग रेल्वे बोगदाजवळील होटेल केवल समोरून तरुणाची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियेश पद्माकर भंगाळे (वय-३०) रा. सुहास नगर, भुसावळ हा जळगाव शहरातील बजरंग रेल्वे पुलाच्या बोगदासमोर असलेले केवल हॉस्पिटल येथे कामानिमित्त ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आला. त्यावेळी (एमएच १९ बीबी ५६५४) क्रमांकाची दुचाकी हॉस्पिटलसमोर पार्क करून लावली. त्यानंतर दुपारी ३ वाजता काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना त्यांची हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी आढळून आले नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.

Protected Content