सावदा नगरपालिकेत असतील २० नगरसेवक : जाणून घ्या प्रभागांची अचूक माहिती

सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी | आगामी नगरपालिका निवडणुकांची प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली असून यात सावदा येथील सदस्यसंख्या १७ वरून २० इतकी झाली असून यात १० प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन असे सदस्य निवडून जाणार आहेत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून जाणून घ्या सावदा शहरातील प्रत्येक प्रभागाची अचूक माहिती.

आम्ही लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर आपल्याला आज सावदा येथे जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनांची सविस्तर माहिती देत आहोत. याआधी आरक्षण रचना जाणून घ्या. आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार सावदा येथे १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून जाणार आहेत. यात एक जागा अनुसूचीत जमाती, एक अनूसुचित जाती, तर एक अनूसुचित जाती महिला अशा तीन जागा राखीव आहेत. महिलांसाठी १० जागा राखीव आहेत. तर ८ जागा अनारक्षीत आहेत. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप निर्णय लागला नसल्याने अनारक्षीत जागांची संख्या ही ८ असली तरी भविष्यात यात घट होऊ शकते हे लक्षात घ्यावे.

सावदा शहरातील एक ते १० प्रभागातील २० जागांचे वॉर्ड हे खालीलप्रमाणे असतील.

प्रभाग क्रमांक -१ यातून १-अ आणि १-ब असे दोन नगरसेवक निवडून जाणार असून या प्रभागातील मतदारसंख्या २२०२ इतकी आहे. या प्रभागात स्वामीनारायण नगर, रावसाहेब प्रेमचंद नगर, साळी बागचा काही भाग, भोईवाडा काही भाग, दुर्गामाता चौक परिसर या भागांचा समावेश आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूज विशेष वृत्तांत.

या प्रभाच्या चतु:सिमा खालीलप्रमाणे आहेत.

उत्तर : शि.स.नं. २६११च्या उत्तर पश्‍चीम कोपर्‍यापासून पूर्वेकडे रस्त्याने शि.स.नं. २४००च्या पूर्व-दक्षीण कोपर्‍यापर्यंत. तेथून उत्तरेकडे शि.स.नं. २३५२ला वळसा घालून पूर्वेकडे एस.टी. रोडपर्यंत. तेथून शि.स.नं. २४९० पूर्व-उत्तर कोपर्‍यापर्यंत.

पुर्व : शि.स.नं. २४९० पूर्व-उत्तर कोपर्‍यापासून दक्षीणेकडे शि.स.नं. २४८० पूर्व दक्षीण कोपर्‍यापर्यंत.

दक्षीण : शि.स.नं. २४८० पूर्व-दक्षीण कोपर्‍यापासून शनि रोडने चांदणी चौकातील शि.स.नं.
२६८१ ला वळसा घालून गांधी चौकातील गावहाळपर्यंत.

पश्‍चीम : गांधीचौकातील गावहाळपासून उत्तरेकडे मेनरोडने शि.स.नं. २६११ च्या उत्तर-पश्‍चीम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक-२ या प्रभागात २-अ आणि २-ब या माध्यमातून दोन नगरसेवक निवडून जाणार असून यातील मतदारसंख्या २२५५ इतकी राहणार आहे. या प्रभागात ख्वाजा नगर,गौसिया नगर, मदिना नगर व ताज्जु शेरिया नगर यांचा समावेश राहणार आहे.

या प्रभागाच्या चतु:सिमा खालीलप्रमाणे असतील

उत्तर- स.नं. ४०६ चे उत्तर पश्चिम कोप-यापासुन जुन्या बर्‍हाणपुर रस्त्याने २अस.नं. ३६० चे उत्तर पुर्व कोपर्‍यापर्यंत
पुर्व- स.नं. ३६० चे उत्तर पुर्व कोप-यापासुन न.पा. हद्दीने मस्कावद रस्त्यापर्यंत २ बस.नं. ३८२ च्या पुर्व बाजुने पुढे स.नं.४०१ चे दक्षिण-पूर्व कोपर्‍यापर्यंत.

दक्षिण- स.नं. ४०१ च्या दक्षिण पुर्व कोपर्‍यापासुन मस्कावद रस्त्याने पश्चिमकडे नाल्यापर्यंत गट नं.१२२९/२+१२३०/२ प्लाट नं. ४ पर्यंत
पश्चिम- गट नं.१२२९/२+१२३०/२ प्लाट नं. ४ पासून मस्कावद रस्ता कोपयापासून उत्तरेकडे नाल्यालगत स.नं.४०६ च्या उत्तर-पश्चिम कोपर्‍यापर्यत.

प्रभाग क्रमांक ३ : शहरातील प्रभाग क्रमांक ३-अ आणि ३-ब यांच्यात एकूण १९३२ मतदार आहेत. येथून दोन नगरसेवक निवडून जाणार असून या प्रभागात भोईवाड्याचा काही भाग, जमादार वाडा, चांदणी चौक आणि बुधवाराचा काही भाग यांचा समावेश आहे. याच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे आहेत. आपण वाचत आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !

उत्तर : चांदणी चौकातील शि.स.नं. २६८१चे उत्तर-पश्‍चीम कोपर्‍यापासून शि.स.नं. २४७९ पर्यंत. तेथून उत्तरेकडे शि.स.नं. २४७५ व पूर्वेकडे शि.स.नं. २४७१ उत्तर पूर्व कोपर्‍यापर्यंत.
पुर्व : शि.स.नं. २४७१च्या उत्तर-पूर्व कोपर्‍यापासून नाल्यालगत दक्षीणेकडे शि.स.नं. १९३५ पूर्व-दक्षीण कोपर्‍यापर्यंत.
दक्षीण : शि.स.नं. १९३५ पूर्व-दक्षीण कोपर्‍यापासून पश्‍चीमेकडे शि.स.नं. २९२९ला वळसा घालून उत्तरेकडे गराडीबुवाचे दक्षीण बाजूस एस.टी. रोडालगत शि.स.नं. २६९५ चे पश्‍चीम-दक्षीण कोपर्‍यापर्यंत.

पश्‍चीम : शि.स.नं. २६९४च्या पश्‍चीम-दक्षीण कोपर्‍यापासून एस.टी. रोडने शि.स.नं. २६८१च्या उत्तर-पश्‍चीम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक-४ शहरातील प्रभाग क्रमांक ४-अ आणि ४-ब यांच्यात एकूण २०६७ मतदार आहेत. येथून दोन नगरसेवक निवडून जाणार असून या प्रभागात डॉ. बाबासाहेब नगर काही भाग, तांबटकर गल्ली, तेलीवाडा काही भाग, चावडीच्या पूर्वेकडील भाग, टेकडी मोहल्ला, भोईवाडा काही भाग यांचा समावेश आहे. याच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे आहेत. आपण वाचत आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !

उत्तर- सि.स.नं.२६११ चे उत्तर-पश्चिम कोपर्‍यासून पूर्वेकडे रस्त्याने सि.स.नं.२४०० चे पूर्व दक्षिण कोपर्‍यापर्यंत तेथून उत्तरेकडे सि.स.नं.२३५२ ला वळसा घालून पूर्वेकडे एस.टी.रोडपर्यत,तेथून सि.स.नं.२५२९ चे पूर्व रस्त्याने सि.स.नं.२४९० पूर्व-उत्तर कोपर्‍यापर्यंत. पूर्व- सि.स.नं.२४९० पूर्व-उत्तर कोपर्‍यापासून दक्षिणेकडे सि.स.नं.२४८० पूर्व-दक्षिण कोपर्‍यापर्यत. दक्षिण-सि.स.नं.२४८० शनिरोडने चांदणीचौकातील सि.स.नं.२६८१ ला वळसा घालून एस.टी.रोडने दक्षिणेकडे सि.स.नं.२६७६ ला वळसा घालून गांधीचौकातील गावहळपर्यत.

पश्चिम- गांधीचौकातील गावहळपासून उत्तरेकडे मेनरोडने सि.स.नं.२६११ चे उत्तर पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक-५ शहरातील प्रभाग क्रमांक ५-अ आणि ५-ब यांच्यात एकूण २१५१ मतदार आहेत. येथून दोन नगरसेवक निवडून जाणार असून या प्रभागात डॉ. बाबासाहेब नगर काही भाग, तेलीवाडा काही भाग, कुंभारवाडा, शेखपुरा काही भाग यांचा समावेश आहे. याच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे आहेत. आपण वाचत आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !

उत्तर : सि.स.नं.२०५२ चे उत्तर-पश्चिम कोपर्‍यापासून पूर्वेकडे एस:टी.रोडने सि.स.नं.२२६० चे उत्तर-पूर्व कोपर्‍यापर्यंत.

पूर्व- सि.स.नं.२२६० चे उत्तर-पूर्व कोपर्‍यापासून दक्षिणेकडे एस.टी.रोडने सि.स.नं.२३३६ चे पूर्व-दक्षिण कोपर्‍यापर्यंत.
दक्षिण- सि.स.नं.२३३६ चे पूर्व-दक्षिण कोपर्‍यापासून पश्चिमेकडे सि.स.नं.२३५२ ला वळसा घालून सि.स.नं.२४०० पुर्व-दक्षिण कोपर्‍यास
वळसा घालून पश्‍चिमेकडे मेनरोडने सि.स.नं.२२०० चे पशि्चम-दक्षिण कोपर्‍यापर्यंत. पश्‍चिम- सि.स.नं.२२०० चे पश्‍चिम-दक्षिण कोपर्‍यापासून सि.स.नं,२०५२ चे उत्तर-पश्‍चिम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक-६ शहरातील प्रभाग क्रमांक ६-अ आणि ६-ब यांच्यात एकूण २२४८ मतदार आहेत. येथून दोन नगरसेवक निवडून जाणार असून या प्रभागात काजीपुरा, वाणीगल्ली, पाटीलपुरा काही भाग, तडवीवाडा काही भाग, जैन मंदिर परिसर या भागांचा समावेश आहे. याच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे आहेत. आपण वाचत आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट !

उत्तर- सि.स.नं.९६३ | उत्तर ससनरद चे उत्ततयार्चम कोप़र्‍यापासून नाल्यालगत पूर्वेकडे सि.स.नं.९९९ ला वळसा घालून दक्षिणेकडे रस्त्याने पूर्वेकडे मेनरोडवरील सि.स.नं.१०७५ चे उत्तर पूर्व ’कोपर्‍यापर्यंत. पुर्व- मेनरोडवरील सि.स.नं.१०७५ चे उत्तर-पूर्व कोपर्‍यापसून दक्षिणेकडे स.स.नं.२९२७ वळसा घालून पूर्वेकडे सि.स.नं.२११८ ला वळसा घालून एस.टी.रोडने दक्षिणेकडे सि.स.नं.२९१९ चे पुर्व दक्षिण कोपर्‍यापर्यंत,तेथून पश्चिमेकडे मेनरोडवरील सि.स.नं.२०५२ ला वळसा घालून मेनरोडने पश्‍चिमेकडे सि.स.नं.२०५० चे पूर्व-दक्षिण कोपर्‍यापर्यंत, दक्षिण- सि.स.नं.२०५० पूर्व-दक्षिण कोपर्‍यापासून लेंडी रस्त्याने पश्‍चिमेकडे
सि.स.नं.९९९४ चे पश्‍चिम-दक्षिण कोपर्‍यापर्यंत.

पश्‍चिम- सि.स.न.११९४ चे पश्‍चिम-दक्षिण कोपर्‍यापासून उत्तरेकडे शि.स.नं.९८५ ला वळसा घालून सि.स.नं.९६८ चे पूर्व बाजूने सि.स.नं.९६३ चे उत्तर-पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक ७ : या प्रभागातून ७-अ आणि ७-ब असे दोन नगरसेवक निवडून जाणार असून याची मतदारसंख्या २०८७ इतकी आहे. यात तडवीवाडा काही भाग, बॉकवर्ड होसिंग सोसायटी,प्लॉट एरिया,ओम कॉलनी,सोमेश्वर नगर,निमजाय माता नगर, सुगंगानगर,स्वामी समर्थ कॉलनी,कोष्टीवाडा आदी भागांचा समावेश आहे. याच्या चतु:सिमा खालीप्रमाणे आहेत.लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

उत्तर- स.नं. ८२ चे उत्तर पश्चिम कोपर्‍यापासुन न.पा. हद्दीने स.नं. १७२ चे ७ अपुर्व उत्तर कोपर्‍यापर्यंत
पुर्व- स.नं. १७२ चे पुर्व उत्तर कोपर्‍यापासुन सरळ रस्त्याने एस.टी. स्टॅण्डचे ७ बपुर्व बाजूने राज्य महामार्ग ओलांडुन मेनरोडने सि.स.नं. ८९८ चे दक्षिण पुर्व कोपर्‍यापर्यंत.

दक्षिण- सि.स.नं.८९८ चे दक्षिण-पूर्व कोपर्‍यापासून पश्चिमेकडे सि.स.नं.९१९ ला वळसा घालून नाल्याने पश्चिमेकडे सि.स.नं.९६३ ला वळसा घालून दक्षिणेकडे सि.स.नं.९८५ चे पश्चिम बाजूने सि.स.नं.१२२३ पर्यंत तेथून लेंडी रस्त्याने मढीचे पूर्व-दक्षिण बाजून सि.स.नं.८२८ ला वळसा घालून आठवडे बाजाराच्या पूर्व बाजूने पूढे पिंपरूड रस्त्याचे स.नं.४१ चे दक्षिणपश्चिम कोपर्‍यापर्यत.

पश्चिम- पिंपरुड रस्त्यालगतच्या स.नं. ४१ चे दक्षिण पश्चिम कोपयापासुन न.पा. हद्दीने उत्तरेकडे स.नं. २४ लगतच्या राज्य महामार्ग ओलांडुन स.नं.८२ चे उत्तर पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक ८ : या प्रभागातून ८-अ आणि ८-ब असे दोन नगरसेवक निवडून जाणार असून याची मतदारसंख्या २१६५ इतकी आहे. यात स्वामीनारायण मंदिर परिसर, रजपूत वाडा, देवकर वाडा, जगमाता परिसर,मोठा आखाडा काही भाग, गवत बाजार काही भाग आदी भागांचा समावेश आहे. याच्या चतु:सिमा खालीप्रमाणे आहेत.लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

उत्तर-सि.स.नं.८२८ चे पश्चिम-दक्षिण कोपर्‍यापासून पुढे मढीचे पूर्व बाजूने ८ अ- लेंडी रस्त्याने सि.स.नं.१२८२ चे उत्तर-पूर्व कोप-यापर्यत. पुर्व-सि.स.नं.१२८२ चे उत्तर-पूर्व कोपर्‍यापासून दक्षिणेकडे सि.स.नं.१२९६ ला ८ ब- वळसा घालून पूर्वेकडेस सि.स.नं.१३४० ला वळसा घालून रस्त्याने सि.स.नं.१४९२ चे दक्षिण-पूर्व कोपर्‍यापर्यत तेथून पुढे पश्चिमेकडे सि.स.नं.१५०४ ला वळसा घालून सि.स.नं.१५५० ला वळसा घालून पूर्वकडे सि.स.नं.२०३ चे पूर्व बाजूने दक्षिणेकडे सि.स.नं.२३३ पूर्व -दक्षिण कोपर्‍यापर्यत, दक्षिण-सि.स.नं.२३३ चे

पूर्व-दक्षिण कोपर्‍यापासून पश्चिमेकडे मेनरोडने सि.स.नं.७२४ चे पश्चिम बाजूने सि.स.नं.६५४ चे उत्तर-पूर्व कोपर्‍याला वळसा घालून पश्चिमेकडे आठवडे बाजारातील सि.स.नं.६५० चे उत्तर पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

पश्चिम- सि.स.नं.६५० चे उत्तर-पश्चिम कोप-यापासून उत्तरेकडे आठवडे बाजाराच्या पूर्व बाजूने सि.स.नं.८२८ चे पश्चिम-दक्षिण कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक ९ : या प्रभागातून ९-अ आणि ९-ब असे दोन नगरसेवक निवडून जाणार असून याची मतदारसंख्या २३७३ इतकी आहे. यात मोठा आड, पाटीलपुरा काही भाग, क्रांती चौक, शिवाजी महाराज चौक, गवतबाजार काही भाग, देशमुखवाडा, गांधीचौक काही परिसर, इंगळेवाडा, बोरोलेवाडी आदी भागांचा समावेश आहे. याच्या चतु:सिमा खालीप्रमाणे आहेत.लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

उत्तर : शि.स.नं. १६९५च्या उत्तर-पश्‍चीम कोपर्‍यापासून पुर्वेकडे पाटीलपुरा रोडाने शि.स.नं. १८५५ उत्तर-पूर्व कोपर्‍यापर्यंत.

दक्षिणः- सि.स.नं.३१४८ ते पूर्व-दक्षिण कोपर्‍यापासून एस.टी.रोडने स्टेशन उत्तर:-सि.स.नं.१६९५ चे उत्तर-पश्चिम कोपर्‍यापासून पूर्वेकडे पाटीलपूरा रोडने सि.स.नं.१८५५ उत्तर-पूर्व कोप-यापर्यंत.

पुर्वः-सि.स.नं.१८५५ चे उत्तर-पूर्व कोपर्‍यापासून दक्षिणेकडे मेनरोडने गांधीचौक गावहळपर्यंत तेथून पूर्वेकडे सि.स.नं.३१७० ला वळसा घालून सि.स.नं.३१४८ चे पुर्व-दक्षिण कोपर्‍यापर्यंत. रस्ता ओलांडून खाई रस्त्याने पश्चिमेकडे सि.स.नं. ५४६ चे पश्चिम-दक्षिण कोपर्‍यापर्यंत,

पश्चिम:-सि.स.नं.५४६ चे पश्चिम-दक्षिण कोपर्‍यापासून पश्चिमेकडे सि.स.नं.२३६ ला वळसा घालून गवतबाजार रस्ता ओलांडून सि.स.नं.२३३ पूर्व बाजूने उत्तरेकडे सि.स.नं.२०३ चे पुर्व उत्तर कोपर्‍यापर्यंत तेथून मेनरोडने पश्चिमेकडे सि.स.नं.१५५० चे पश्चिम बाजूच्या गल्लीने उत्तरेकडे सि.स.नं.१५०४ ला वळसा घालून सि.स.नं.१४९६ चे पश्चिम बाजूने उत्तरेकडे सि.स.नं.१६९५ चे उत्तर-पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

प्रभाग क्रमांक १० : या प्रभागातून १०-अ आणि १०-ब असे दोन नगरसेवक निवडून जाणार असून यात बुधवारा काही भाग,मोठा मठ परिसर,गांधीचौक काही भाग,मेहतर कॉलनी,पोलिस
स्टेशन,१३२ केव्ही सब स्टेशन,गवत बाजार काही भाग,मोठा आखाडा काही भाग यांचा समावेश आहे. येथील मतदारांची एकूण संख्या-१९८७ असून याच्या चतु:सिमा खालीप्रमाणे आहेत.

उत्तर- स.नं. ६१६ चे उत्तर पश्चिम कोपर्‍यापासुन पिंपरुड रस्त्याने आठवडे १० अबाजाराचे पूर्व बाजूने सि.स.नं.६५० व ६५४ ला वळसा घालून मेनरोडने सि.स.नं.५९८ च्या पूर्वबाजूने गवतबाजार रस्त्याने सि.स.नं.२३६ चे दक्षिण १० बाजुने सि.स.नं.५४६ च्या पश्चिम बाजूने खाई रस्त्याने पूर्वेकडे स्टेशन रस्ता ओलांडून सि.स.नं.३१८८ चे दक्षिण बाजूने सि.स.नं.३२०६ ला वळसा घालून उत्तरेकडे सि.स.नं.३२६२ पर्यंत तेथून पूर्वेकडे सि.स.नं.३२३३ ला वळसा घालून एस.टी.रोड ओलांडून महाजन गल्लीने गराडीबुवाचे दक्षिण बाजूलगत सि.स.नं.२८५१ चे दक्षिणेकडे सि.स.नं.२९२९ ला वळसा घालून पूर्वेकडे सि.स.नं.२९३५ चे पुर्व-दक्षिण कोपर्‍यापर्यंत तेथून नाल्याने उत्तरेकडे मस्कावद रस्त्यावरील स.नं.४०८ ला वळसा घालून मस्कावद रस्त्याने पूर्वेकडे स.नं.४१३ चे उत्तर-पूर्व कोपर्‍यापर्यत.

पुर्व- मस्कावद रस्त्यावरील स.नं. ४१३चे उत्तर पुर्व कोपर्‍यापासुन दक्षिणेकडे न.प.हद्दीने स्टेशन रस्ता ओलांडून स.नं. ४४९ च्या दक्षिण पुर्व कोपर्‍यापर्यंत.

दक्षिण- स.नं. ४४९ च्या दक्षिण पूर्व कोपर्‍यापासुन पश्चिमेकडे न.पा. हद्दीने थोरगव्हाण रस्ता ओलांडुन स.नं. ६१६ चे दक्षिण पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

पश्चिम- स.नं. ६१६ चे दक्षिण पश्चिम कोपर्‍यापासुन न.पा. हद्दीने उत्तरेकडे स.नं. ६१६ चे उत्तर पश्चिम कोपर्‍यापर्यंत.

Protected Content