फैजपूर येथे संत सम्मेलन अन श्रीराम कथेची उत्साहात सांगता (व्हिडीओ)

c4c9022f 726f 49a7 89ac 583990a45325

फैजपूर, प्रतिनिधी | येथे संत सम्मेलन व श्रीराम कथा समाप्तीने खंडोबा देवस्थानचे ब्रम्हलीन महंत घश्यामदास महाराज यांची प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील श्री खंडोबा देवस्थानचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचवण्याचे कार्य महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांनी करावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर अनी आखाडा नाशिकचे अध्यक्ष रामकिशोर शास्त्री यांनी यावेळी केले.

 

यावेळी व्यासपीठावर विष्णुदास महाराज सप्तश्रुंगीगड वणी, करण महाराज वृंदावन, रामस्नेही महाराज नाशिक (तपोवन), महंत रामशरणदास महाराज गुजरात, महंत अदवंतानंद सरस्वती महाराज कानळदा आश्रम, महंत गोपाल चैतन्य महाराज पाल, भरत दास महाराज कुसुबा, शास्त्री भक्तीस्वरूप दासजी, शास्त्री जगत प्रकाश दासजी, सुनासावखेडा, शंकरदासजी महाराज नाशिक, महंत शिवमदासजी महाराज धर्माबाद, महंत कन्हैय्या महाराज चिनावल, महंत बालक दासजी महाराज जळगाव, पुराण दासजी महाराज भामलवाडी, एकनाथ महाराज अयोध्या, साध्वी धर्मश्री दीदी आळदी, शकुंतला दीदी, मिरा दीदी, प्रवीण महाराज,कन्हैया महाराज आमोदा महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज, कथाकार प.पु.अजय शंकर भार्गव आदी संत उपस्थित होते.

व्यासपीठावरावरील संत महंतांसह माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार हरिभाऊ जावळे, नरेंद्र नारखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार जावळे यांनी भक्तनिवाससाठी १० लाखांचा निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे सांगितले. सकाळी खंडोबा देवस्थानात महायज्ञ करण्यात आला यावेळी कथेचे यजमान अरुण होले व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा होले आणि धनराज नारखेडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनंदा नारखेडे तसेच अशोक बुलाखी राणे, सौ. पुनम राणे, बाळू गोविंदा नारखेडे, सौ. संगीता नारखेडे, केतन धनजी गुजराती, अनिता धनजी गुजराती या पाच जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मंत्रजाप हरिकिशोर जैमिनी मध्यप्रदेश प्रदेश, नंदू जोशी फैजपूर यांनी केला.

दिंडी सोहळा खंडोबा देवस्थान परिसरातुन निघुन शहरातील विठ्ठल मंदिर खुशाल भाऊ रोड आदी भागातून श्रीराम भजनी मंडळ विठ्ठल मंदिर, आत्मप्रवर्तक भजनी मंडळ, त्रिवेणी राधाकृष्ण भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, सतवंती महिला भजनी मंडळ, भक्ती महिला भजनी मंडळ, सर्व पुरुष भजनी मंडळ फैजपूर भाविक भक्त गण तल्लीन झाले होते.

यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिलेल्या दहा हजार रोपांचे उपस्थित भक्तगण यांना मोफत वाटप करण्यात आले. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, स्वामी भक्तीप्रकाश दास शास्त्री यांनी ब्रम्हलीन घनश्याम दासजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. रामकथेचे आयोजक अरुण होले, प्रतिभा होले, धनराज नारखेडे, सुनंदा नारखेडे यांचा संत महंतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन महंत नागिनदास महाराज बैरागी मलकापूर तसेच श्री. गुरव यांनी केले. आभार गादिपती पुरुषोत्तमदास महाराज यांनी मानले.

 

 

Protected Content