मराठा सेवा संघ व तुकाराम महाराज उत्सव समितीतर्फे कोरोना योध्द्यांचा सत्कार

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ व जगतगुरु संत तुकाराम महाराज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा महिलांचा सत्कार करण्यात आला.

मराठा सेवा संघ व तुकाराम महाराज उत्सव समितीतर्फे पांचाळेश्रर नगरातील मिठाबाई कन्या शाळेत पाचोरा शहरातील विविध क्षेत्रातील कोरोना योद्धा महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सेवा निवृत्त फौजी रविंद्र पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक हरी पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, एस. के. पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र सुकदेव पाटील, उद्योजक रविंद्र चंदीले, रविंद्र भिमराव पाटील, आर. बी. चव्हाण, यांच्यासह सन्मानार्थी प्रा. मंगला शिंदे (सामाजिकक्षेत्रात), फरीदाबी खान (सरकारी रुग्णालय), योगिता पाटील (एस.टी. महामंडळ), भारती बागड (आदर्श शिक्षक) रेखा साळुंखे (तहसील) यांना सन्मान चिन्ह व पुप्षहार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत पोवाडा-गीत शाहीर विठ्ठल महाजन यांनी सादर केले. तर मंगला शिंदे व भारती बागड यांनी उपस्थित विद्यार्थीनीनां माँसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत रहस्यमय आणि प्रबोधनात्मक विचार मांडले तर सुर्यवंशी यांनी आभार मानले. तसेच युवा नेते संदिप राजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Protected Content