केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयाला भेट

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जिल्ह्यातील खामगाव येथील  ऐतिहासिक वारसा असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाला केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी सदिच्छा भेट दिली.

 

टिळक राष्ट्रीय विद्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खा. डॉ. अनिल बोंडे, आ. अॅड. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे, आ. श्वेताताई महाले,  माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, वैभव डवरे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे आणि सर्व विश्वस्त यांच्यातर्फे भुपेंद्र यादव यांचा सत्कार करण्यात आला.  यादव यांनी राष्ट्रीय विद्यालयाचा परिसराची पाहणी केली. महात्मा गांधी यांचे हस्ते उद्घाटन झालेले चरखालय, वल्लभभाई पटेल यांचे हस्ते उदघाटन झालेला ध्वजस्तंभ, सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिलेली जागा, वि. दा.सावरकर यांनी भेट दिलेली जागा, वास्तुकलेचा अप्रतिम नमूना असलेले कलाभवन, कलाकारखान्यामधील कलाकृती पाहिल्या. त्यावेळी  गिरी यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली.  यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सभास्थळी कलाचार्य पंधे गुरुजी यांचे समाधी आणि लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुताचा हार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा स्वागत सत्कार संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे यांचे हस्ते करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे यांनी निवेदन सादर केले.

यादव यांनी टिळक राष्ट्रीय विद्यालय हे गुरु शिष्य परंपरा जपणारे विद्यालय आहे. या राष्ट्रीय शाळेने शिक्षणाच्या माध्यमातून मानवी मुल्य, वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत, विद्यालयाने केलेल्या सृजनात्मक कार्य केले आहे. या केलेल्या गौरवपूर्ण  कार्यामुळे विद्यालयाला भेट देण्याचा योग आला.  गौरवपूर्ण इतिहास असलेल्या या शाळेला सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी संस्थासचिव तथा मुख्याध्यापक संजय पातुर्डे, उपाध्यक्ष सुरेश पारीक, कोषाध्यक्ष उमेश अग्रवाल, विश्वस्त मधुसूदन गाड़ोदिया, विश्वस्त अशोक झुंझुनुवाला आदी उपस्थित होते.

 

Protected Content