चाळीसगाव महाविद्यालयात रोजगार मार्गदर्शन

चाळीसगाव महाविद्यालयात रोजगार मार्गदर्शन

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बि.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘वनस्पतीशास्त्र विषयात रोजगाराच्या संधी’ या विषयावर कार्यक्रम साजरा झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेणे फार गरजेचे आहे असे नमूद करत ग्रॅज्युएशन नंतर सध्या वेगवेगळया संध्या उपलब्ध असताना आपल्याला त्याची माहिती नसल्याने रोजगाराची संधी हुकत असते, असे सांगितले. विभाग प्रमुख प्रा.डि.एन उंदीरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठेवत असे कार्यक्रम घेण्यामागेचे कारण सांगितले,

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमधे विषयाबद्दल आवड निर्माण करणे व विषया संबंधी असलेल्या नौकरीच्या संधी कुठे- कुठे उपलब्ध आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजे असे मत मांडले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते डॉ. मयूर डोंगरे, एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज, धुळे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत यावर सविस्तरपणे मुद्देसूद मांडणी करत ते प्रथम व द्वितीय वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्राची के. भोई यांनी केले. आभार प्रदर्शन विभागातील प्रा. व्ही. यू. पवार, यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाचे प्रयोगशाळा सहायक एच. डि. गायकवाड, संजय जाधव व संजय मोरे यांनी मदत केली.

Protected Content