कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणी जखमी

 

 

जळगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बिग बाजार पसिरात कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरुन तरुणी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कारचालका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी साक्षी सुनील नेवे वय २२ ही रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तिच्या एम.एच ए.एम ६५७३ या क्रमाकांच्या दुचाकीने रेल्वे स्टेशन येथे जात होती, यादरम्यान बिग बाजार परिसरातील रोड वर एका भरधाव कारने साक्षी हिच्या दुचाकीला मागून धडक दिली, या घटनेत साक्षी ही जखमी झाली आहे. धडकेनंतर कारचालक हा घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी साक्षी हिने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील हे करीत आहेत.

Protected Content