आज यावल शहरात एक दिवस कडकडीत ‘जनता कर्फ्यू’

यावल, प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर ग्रामीण भागात वेगाने पसरला असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीनशेच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून यावल शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक दिवशीय जनता कर्फ्यूचे पालन केले.

आज यावल शहरात शुक्रवार हा बाजार दिवस असल्याने व्यापाऱ्यांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला. यास चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी आपल्या घरातच राहावे सुरक्षित रहावे व शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले , तहसीलदार कुवर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा महाजन, डॉ हेमंत बऱ्हाटे, यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे. आज शुक्रवार दि. १० जुलै रोजी तालुका आरोग्य प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोनाविषाणू संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २९७ वर जाऊन पोहोचली आहे. यात रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे यावल शहरातील बाधित रुग्णांची संख्या ४७ यातील सहा जणांचा मृत्यू व ३२ जण कोरोना मुक्त झाले असून ९ बाधित रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहे. फैजपुर शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ५९ झाली असून यातील ४५ रुग्ण उपचार घेऊन परतले असून यातील चार रुग्णांच्या मृत्यू झाला असून सध्या दहा जण उपचार घेत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील वेगाने वाढलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८५ इतकी झाली असून यातील ११२ उपचार घेऊन घरी परतली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला असून कोविड सेंटरला सध्या ५९ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे. आज यावल तालुक्यात बामणोद गावात १ आणि फैजपूर शहरातून १ रुग्ण मिळून आला असून तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ३००च्या जवळ पोहोचली असल्याची माहिती यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन, तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी दिली आहे.

Protected Content