भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण; कुटुंबातील आठ सदस्यही पॉझिटीव्ह

भिवंडी (वृत्तसंस्था) भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

 

खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षण असल्याने घरातच क्वारंटाईन करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यातील महापौर, उपमहापौर यांच्यासह भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Protected Content