नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदावरुन आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटवले

 

नागपूर (वृत्तसंस्था) गेल्या काही काळापासून नागपूर महापालिका नगरसेवक आणि सर्वपक्षीय नगरसेवक आणि आयुक्त मुंढे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु होता. तशात आता नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प’ सीईओ पदावरुन हटविण्यात आल्यामुळे पुन्हा चर्चेला उधान आले आहे. मुंढे यांच्या ऐवजी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे स्मार्ट सिटी संचालक पदावर असणार आहेत.

 

 

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकपदी मुंढे यांची नियुक्ती होणे आणि सर्व सहमतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करणे याबाबत एक बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल पाच महिन्यांनी झालेल्या या बैठकीस प्रवीण परदेसी हेसुद्धा उपस्थित होते. सिटी कंपनीच्या संचालकपदी मुंढे यांची नियुक्ती आणि त्यानंतर सर्वांच्या सहमतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती या दोन विषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सुमारे पाच महिन्यानंतर कंपनीच्या बैठकीला प्रवीण परदेसी हे देखील उपस्थित होते. या बैठकीत सत्ताधारी भाजपने आयुक्त मुढे यांच्यावरस्मार्ट सिटीचे संचालक नसतानाही आयुक्तांनी त्यांच्या पदाचा वापर केला. तसेच २० कोटी रुपयांची देयके चुकती केल्याचा आरोप केला. त्यानंतर नागपूर महानगरपालिका तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रकल्प सीईओ पदावरुन हटविण्यात आले. स्मार्टी सिटी समन्वयक म्हणून मुंढे कामकाज पाहू शकणार असल्याचाही निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तुकाराम मुंढेंवर स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्द्यांवर भाजपने अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवर तब्बल तीन सातापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. “आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचं संचालकपद आणि सीईओपद बेकायदा बळकवल्याचं आजच्या बैठकीत सिद्ध झालं” असं नागपूरचे महापौर संदीप जोशी बैठकीनंतर म्हणाले.  तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाची धुरा अवैधरित्या बळकावल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

Protected Content