Home Cities धरणगाव धरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन यांचा राजीनामा ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

धरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन यांचा राजीनामा ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0
27

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सोमवारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन यांनी आज सकाळी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी यांच्याकडे सादर केला. नामदार गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार आपण राजीनामा देत असल्याचे सुरेखा महाजन यांनी स्पष्ट केले.

उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना मिळालेल्या कालावधीत सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांची विविध कामे करण्याची संधी मिळाली, याचे समाधान असल्याचे सुरेखा महाजन यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या आणि अडचणींना प्राधान्य देत आपल्या पदाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. आज सकाळी नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी यांची भेट घेत सुरेखा महाजन यांनी त्यांच्याकडे राजीनामापत्र सुपूर्द केले. राजीनामा देताना आपल्या कार्यकाळात नागरिकांच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, सुरेखा महाजन यांच्या राजीनाम्यामुळे धरणगाव नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नेमक्या कोणत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर झाला, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या पदावर कोणाची निवड होते, याकडेही नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. सुरेखा महाजन यांच्या राजीनाम्यामुळे धरणगाव नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. धरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन यांनी नामदार गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना वेग आला आहे.


Protected Content

Play sound