अतिक्रमण निर्मुलन विभागाद्वारे ५ हातगाड्या जप्त

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सण उत्सवाच्या काळानंतर अतिक्रमण विभाग सोमवारपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.  याची सुरुवात काल पासून गणेश कॉलनी येथून करण्यात आली असून आज ५ हातगाड्या व २ ज्युस विक्री सेंटर जप्त करण्यात आले.

 

शहरातील हॉकर्स बांधवांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ख्वाजामिया चौफुलीजवळील ओपन स्पेस येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तेथे थोडेच हॉकर्स बांधव व्यवसाय करत असून उर्वरित हॉकार्स बांधव शहरांमध्ये रस्त्यावर विक्री करताना दिसत आहेत. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.  रहदारीस अडथळा निर्माण करण्याऱ्या अशा हॉकर्स वर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.आज सलग दुसऱ्या दिवशी देखील कारवाई करण्यात आली. काल अतिक्रमण निर्मुलन पथकाने गणेश कॉलनी, सुभाष चौक, बळीराम पेठ येथील १० ते १२ हात गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. या करिता अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन पथक नेमण्यात आले आहे.तर आज गणेश कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर,सुभाष चौक परिसर, बळीराम पेठ, टाॅवर रोड ते भिल पुरा  चौक पर्यंत अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून कारवाई कण्यात आली. यात पाच हातगाड्या व २ ज्यूस केंद्र यांचा समावेश आहे. दरम्यान, मुक्ताईनगर येथे मनपा हद्दीत बंद अवस्थेत असलेले दूध विक्री बूथ देखील जप्त करण्यात आले.  ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, साजिद अली, सतीश ठाकरे, दीपक कोळी, नाना भालेराव, शेखर ठाकूर, भानू ठाकूर आदींच्या पथकाने केली.

Protected Content