शार्टसर्कीटमुळे शेतातील घराला आग

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रोटवद शिवारातील शेतातील घरात इलेक्ट्रिक शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ८० हजार रुपये किमतीचे कापूस, कांदा बियाणे, फवारणी, कापूस व रासायनिक खते आदी असा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतारसिंग लालचंद परदेशी (वय-६९, रा. कासमपुरा, ता.पाचोरा जि.जळगाव) यांचे जामनेर तालुक्यातील रोटवद शिवारात शेत आहे. शेतात त्यांनी सामान ठेवण्यासाठी घर केले आहे. २७ ऑक्टोबर रात्री ७ ते २८ ऑक्टोबर सकाळी ७ वाजता दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील घरात ठेवलेले कापूस, रासायनिक खते, कांद्यांची बियाणे, फवारणी पंप, लोखंडी पत्रे, पाण्याची टाकी व पीव्हीसी पाईप असा मुद्देमाल जळून खाक झाला असून सुमारे ८० हजार रुपयांची नुकसान झाल्याचे घटना समोर आले आहे. याबाबत कतारसिंग परदेशी यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करीत आहे .

 

Protected Content