पाचोरा-खेडगाव रस्त्यावरील अपघातात पाथरी येथील तरूणाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कामावरून घरी निघालेल्या तरूणाची दुचाकी उभ्या ट्रकला धडक दिल्याने तालुक्यातील पाथरी येथील तरूणाचा  तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा-खेडगाव दरम्यान बुधवारी घडली होती. जिल्हा रूग्णालयात रात्री ११ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी झीरो नंबरने शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, देवेंद्र हिरामण चौधरी (वय-२८) रा. पाथरी ता.जि.जळगाव हा तरूण पाचोरा येथे कापड दुकानावर कामाला आहे. वराड ते पाचोरा असा त्याचा दुचाकीने ये-जा करत असतो. नेहमीप्रमाणे २४ मार्च रोजी ८ वाजता कामावरून (एमएच १९ बीडी ९९७१) क्रमांकाच्या दुचाकीने पाथरी येथे जाण्यासाठी निघाला. पाचोरा -खेडगाव रस्त्यादरम्यान मुख्य रस्त्यावरून जात असतांना रस्त्यावर उभा असलेला (एमएच ०४ एफपी १५४२) क्रमांकाच्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिली. यात देवेंद्र चौधरी गंभीररित्या जखमी झाला. तातडीने खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रात्री ११ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आई उषाबाई, विवाहित बहिण आणि वडील असा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.  याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. 

Protected Content