राज्यातील पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे

जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  वाढत आहे.  या कालावधीत विद्यार्थी हितास प्राधान्य देवून पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे  यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे  कळविले आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी)  २३ मे २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती.  मात्र, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देवून ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल असे आयुक्त सुपे यांनी स्पष्ट केले आहे. 

 

Protected Content