मुस्लिम मंचचा निषेधाचा सतरावा दिवस ; पाकिस्तानचा ध्वज जाळुन नोंदविला विरोध

WhatsApp Image 2020 01 09 at 7.54.19 PM

जळगाव, प्रतिनिधी | मुस्लिम मंचद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व कायदा रद्द साठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा गुरुवारी सतरावा दिवस होता. या दिवशी शाहूनगर येथील विविध तरुणांच्या संघटनांनी एकत्रित येऊन यात सक्रिय सहभाग नोंदविला.

मुस्लिम मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला. पाकिस्तान प्रांतातील पंजाब येथील नानक साहिब गुरुद्वारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व त्यास पाकिस्तानचा असलेला छूपा सहकार्य याबाबत मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख यांनी सविस्तर माहिती विशद केली. पाकिस्तान देशाचा व ज्यांनी हे कृत्य केले त्यांचा निषेध म्हणून मौलाना अखतर नदवी यांच्या हस्ते पाकिस्तानचा ध्वज जाळून पाकिस्तानचा निषेध केला.  उपोषणाची सुरवात सतराव्या दिवसाची उपोषणाची सुरुवात मुफ़्ती अतिकउर रहमान यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता मौलाना अख्तर नदवी यांच्या दुवा ने झाली.
उपोषणा ठिकाणी यांनी केलेले मार्गदर्शन
मुस्तफा सर, सय्यद फारुख, मोहम्मद साजिद, मौलाना शरीफ, सौ निवेदिता ताठे, अन्वर मुलतानी, जननायक फाऊंडेशनचे फिरोज पिंजारी, एजाज अहमद, फिरोज शेख, बागवान नूर मोहम्मद, मराठा सेवा संघाचे सुरेश मराठे ,लोकसंघर्ष चे मुकुंद सपकाळे, यांनी मार्गदर्शन केले.

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

मौलाना अख्तर नदवी, यांच्या नेतृत्वात सय्यद फारूक गफार, महमूद शेख, शेख रईस, शेख साजिद, शेख फिरोज, शेख इम्रान, शेख एजाज, शेख असिफ, शेख रईस, याकूब खान, नूर मोहम्मद, मुकीम अहमद यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारुडे यांना निवेदन दिले.

पाकिस्तानचा ध्वज जाळतांना यांची होती उपस्थिती
गफ्फार मलिक, करीम सालार, आयाज अली, फारुक शेख, ताहेर शेख, इमरान शिकलकर, उमर कासिम, शरीफ शाह, इक्बाल पिरजादे ,अन्वर मुलतानी, मुस्ताक सालार, इमरान भैय्याजी, मुक्तार दादा, युसुफ ठेकेदार, आसिफ शेख, नाजिम अहमद, अब्दुल रजा, गयास असलम खाटीक, महबूब खान, इमरान शेख, जिया शेख, निसार सय्यद, जुबेर शेख, रईस जाबिरअली, सलीम मणियार ,सलीम शेख ,हारून शेख, रउफ़ टेलर, फारूज अहेलेकार, एजाज अहमद, सुरेश तायडे, साहेबराव विकास वानखेडे, सुरेश मराठे यांची होती उपस्थिती.

Protected Content