कांदा निर्यात बंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकार ने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा हे नाशवंत पीक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या कांद्याला मोठी मागणी आहे. कांदा निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळत होते. कांदा निर्यात बंदीमुळे त्याचे भाव अचानक गडगडले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे परकीय चलन येणार नाही. निर्यात बंदीमुळे शेतकरी, व्यापारी यांचेच नाहीतर देशाचे नुकसान होत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मालिन होईल अशी भीती श्री. पाटील यांनी व्यक्त करत कांदा निर्यात बंदी उठविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विलास पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदीप बंडू भोळे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, प्रदेश सरचिटणीस (युवा ) संदीप पाटील, उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महानगराध्यक्ष अक्षय वंजारी, रोहित सोनवणे, अकील पटेल, पंकज बोरोले, पराग पाटील, वाय . एस. महाजन, जयप्रकाश महाडिक, रोहन सोनवणे, ललित बागुल, मंगला पाटील, काशिनाथ इंगळे, संजय चव्हाण, अशोक सोनवणे उमेश नेमाडे, ऍड. ज्ञानेश्वर बोरसे, गणेश नन्नवरे, दिनेश जगताप, जयेश पाटील आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/325887601825830/

 

Protected Content