अधिसूचना रद्द ; मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने मानले आभार

फैजपूर, प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजनेसंदर्भात व्यत्यय आणणारी १० जुलैची अधिसूचना शासनाने रद्द केल्याबद्दल यावल-रावेर तालुक्यातील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने आ. शिरीष चौधरी यांचे आभार
मानले आहेत.

१ नोव्हेबर २००५ पूर्वी व नंतर शासनाने १०० टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जुनी पेन्शन देण्यात आडथळा आणणारी दि. १० जुलै २०२० रोजी काढली होती. ही अधिसूचना शासनाने रद्द केल्याबद्दल यावल-रावेर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने प्रातिनिधिक स्वरुपात रावेर विधानसभेचे आ. शिरीष चौधरी यांचे आभार मानले. ही अधिसूचना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना मारक ठरणारी होती व अधिसूचना नियम व अटींचे पालन करून रद्द करण्यात यावी याकरिता आ. शिरीष चौधरी यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केलेली होती. त्याचप्रमाणे या विषयासंदर्भात महाविकास आघाडीच्या सर्व विधानपरीषद, विधानसभा सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे वेळो-वेळी पाठपुरावा करून हि जाचक आधिसुचना रद्द करण्याबाबत यश संपादन केलेले आहे. महाविकास आघाडी शासनाने हि अधिसूचना रद्द केल्याबद्दल व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आ. शिरीष चौधरी यांचे सर्वांकडून प्रातिनिधिक स्वरुपात आभार व्यक्त करतांना यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, यावल मुख्याध्यापक संघ जयंत पाटील, कुंभारखेडा मुख्याध्यापक ए. डी. पाटील, मुख्याध्यापक गणेश गुरव , ललित फिरके, अशफाक सर(मारूळ), ललित चौधरी मल्लिक शरीफ, किशोर चौधरी (वड्री) आदी उपस्थित होते.

Protected Content