विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ‘वर्ल्ड नेचर कंजर्वेशन डे’ उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमिक विभागामध्ये या ‛वर्ल्ड नेचर कंजर्वेशन डे’ निमित्ताने पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

२८ जुलै हा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. पर्यावरणा प्रती मानवाची सजगता याबद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमिक विभागामध्ये या ‛वर्ल्ड नेचर कंजर्वेशन डे’ निमित्ताने पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुरुवातीला प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी भव्य पृथ्वी गोलाचे पूजन केले. तब्बल सहा फूट  असलेला हा पृथ्वीगोल कलाशिक्षक दत्तात्रय गंधे आणि नितीन सोनवणे यांनी तयार केलेला आहे. या वसुंधरा पूजनानंतर पवन पाटील यांनी हा दिवस का साजरा केला जातो? आणि मानवाने निसर्ग संवर्धनासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे? कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ? याबद्दल माहिती सांगितली.

या दिनाच्या अनुषंगाने पोस्टर बनवण्याची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल यावेळी घोषित करण्यात आला. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती. पाचवी ते सातवी प्रथम गट आणि आठवी ते दहावी दुसरा गट. दोन गटात प्रत्येकी चार बक्षिसे काढण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण दत्तात्रय गंधे यांनी केले. संगीत शिक्षक शुभदा नेवे आणि भूषण खैरनार यांनी वसुंधरा वाचवा हा संदेश देणारे गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गाडीलोहार यांनी केले. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील समन्वयक गणेश लोखंडे यांच्यासह अन्य शिक्षकांनी शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पाहिला. कलाशिक्षक दत्तात्रय गंधे यांनी शालेय परिसरात टाकाऊ वस्तूंपासून वन देखावा साकारला होता. सर्व विद्यार्थ्यांना ई  प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –

गट पहिला 

प्रथम क्रमांक- अस्मि निकेश विसपुते

द्वितीय क्रमांक -आदित्य दत्तात्रय गंधे

तृतीय क्रमांक- स्नेहा पाथरकर

उत्तेजनार्थ-अक्षरा प्रशांत देवरे

दुसरा गट

प्रथम क्रमांक-अपेक्षा गुलाब बडगुजर

द्वितीय क्रमांक- अनन्या जितेंद्र सिंग

तृतीय क्रमांक- खुश संजय अंबुसकर

उत्तेजनार्थ- प्रतीक योगेश नेरपगार

 

 

Protected Content