महानगरपालिका व नगरपालिकांमधील कर्मचार्‍यांना ५० लाखांचे विमा कवच

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परीषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी वा कर्मचार्‍यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याचा जळगाव महापालिकेसह सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे.

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचार्‍यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णयआज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगपालिका तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायती यांना ही योजना लागू राहील. त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, कंत्राटी व मानधन तत्त्चावरील व बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांचा देखील यात समावेश करण्यात येतील.

दरम्यान, आज मंत्रीमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायती तसेच जळगाव महापालिकेतील कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

Protected Content