सुप्रिम कॉलनीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून घरातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु, अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आले नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दीपक जगदाळे करीत आहे.

Protected Content