चित्रकार वंदना पवार यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई, ग्लोबल गोल्ड टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरीय नवदुर्गा पुरुस्कारासाठी जळगावातील महिला चित्रकार वंदना संतोष पवार यांची नुकतीच निवड झालेली आहे.

नवदुर्गा पुरस्कार हा त्यांच्या चित्रकलेतील कार्याबद्दल मिळालेला आहे. सदर पुरस्कार 13 मार्च रोजी मुंबई एका कार्यक्रमात मिळणार आहे. वंदना पवार या क्रिएटिव  चित्रकार (रचना चित्रकार)असुन त्यांच्या चित्रकृतीतून नामांकित वृतपत्र पत्रिकांच्या मुखपृष्ठ तसेच अनेक नामवंत साहित्यिकां च्या कथा व कविता सुशोभित होत असतात. त्यांना  2019- 2020 या वर्षाचाऑनलाइन आर्ट एग्जीबिशन मध्ये  गोल्ड मेडल व अन्य पुरुस्काराने  सम्मानित केले गेले आहे. वंदना पवार यानी चित्रकलेचे शिक्षण ललित कला महाविद्यालय जळगांव येथे घेतले असून त्याच महाविद्यालययात  प्राध्यापिका या पदावर कार्य करीत आहे.

वंदना परमार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष धनंजय कोल्हे, प्राचार्य जितेन्द्र भांरबे , उद्योजक नितिन नेरकर, गोपाल पवार, प्रसिध्द छायाचित्रकार बंसीलाल परमार यांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content