एसटीच्या अधिकाऱ्यांनी संपकऱ्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे नेले हसण्यावारी 

 जळगाव लाइव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्याच्या  संपामुळे वेतन नसल्यामुळे घरमालकांनी देखील या कर्मचाऱ्यांना घर खाली करण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यामुळे संपकऱ्यांच्या कुटुंबियांनी जळगाव विभाग प्रमखांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्यांकडून संपकऱ्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून न घेता हसण्यावारी नेल्याने कर्मचाऱ्याच्या माता-भगिनींचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले.
गेल्या चार साडेचार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.  परंतु या संपात अजूनही बरेचसे कर्मचारी सहभागी असल्यामुळे वेतन देखील थांबले आहे. त्यामुळे भाडयाच्या घरात रहिवास असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरमालकांनी घर खाली करण्यासंदर्भात सूचना किंवा नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे संपकऱ्यांच्या कुटुंबियांनी जळगाव विभाग प्रमुख यांचेकडे भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.   परंतु एसटीच्या जळगाव विभाग प्रमुख जगनोर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडून संपकऱ्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून न घेता हसण्यावारी नेले. एसटीच्या अधिकाऱ्यांकडून संपकऱ्यांच्या कुटुंबियांना अवमानकारक वागणूक मिळाल्यामुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या माता-भगिनींचा संताप अनावर झाल्याचे आज गुरुवारी दिसून आले.

विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात निर्णयाधीन

सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ वा अन्य मागण्या मान्य केल्या असल्या तरी विलीनीकरण मुद्द्यावर संपकरी कर्मचारीवर्ग ठाम आहेत. जिल्ह्यात ११ आगारातील ४५०० हून कर्मचाऱ्यांपैकी प्रशासनाच्या आवाहनामुळे ११००च्या वर कर्मचारी कामावर आले आहेत. दरम्यान सुमारे १००० कर्मचाऱ्यावर बडतर्फी सेवासामाप्ती, निलंबन, प्रशासकीय बदली अशा कारवाया देखील प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात निर्णयाधीन आहे.

Protected Content