मशिदीत लाऊडस्पीकर वापरणे मूलभूत अधिकार नाही : कोर्टाची स्पष्टोक्ती

लखनौ -वृत्तसंस्था | सर्वत्र भोंग्यांवरून वातावरण तापले असतांना अलाहाबाद हायकोर्टाने एका याचिहेकेवरील निकालात मशिदीत लाऊडस्पीकर वापरणे हा मूलभूत अधिकार नसल्याचे निरिक्षण नोंदविले आहे.

बदाऊ जिल्ह्यातील बिसौली तहसीलअंतर्गत एका गावातील इरफान नावाच्या व्यक्तीने मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर लावण्याची मागणी प्रातांधिकार्‍यांकडे केली होती. पण, त्यांनी परवानगी दिली नसल्याने इरफानने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. मशिदीमध्ये लाऊडस्पीकरचा वापर करू द्या, असे निर्देश सरकारी अधिकार्‍यांना द्यावे, अशी मागणी करणारी याचिका त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच एसडीएमने दिलेला आदेश बेकायदेशीर असून मशिदीमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याच्या माझ्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे, असा युक्तीवाद देखील त्याने याचिकेतून केला होता. त्यानंतर मशिदीमध्ये लाऊडस्पीकरचा वापर करणे हा मूलभूत अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवलं. तसेच याचिका चुकीची आहे म्हणत न्यायालयाने ती फेटाळून लावली.

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या २०२० मध्ये अजानचे पठण इस्लामिक धर्माचा अविभाज्य भाग आहे, असं सांगत उत्तर प्रदेशातील विविध मशिदींमध्ये लॉकडाऊन काळातही अजान वाचण्याची परवानगी दिली होती. पण,  अजान हा मुस्लीम धर्माचा अविभाज्य भाग आहे. पण, लाऊडस्पीकर त्याचा अविभाज्य किंवा अत्यावश्यक भाग नाही. कोणत्याही यंत्राचा वापर न करता अजान वाचता येते, असं न्यायालयानं त्यावेळी म्हटलं होतं. यानंतर आता लाऊडस्पीकरचा वापर हा मूलभूत अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!