मौन पाळून लोकराजाला वाहिली आदरांजली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जळगाव महानगर पक्ष कार्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद मौन पाळण्यात आले व कृतज्ञता दिनानिमित्त लोकनेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील , सेवादेलचे जिल्हा अध्यक्ष वाय. एस . महाजन, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील , मिनाक्षीताई चव्हाण , युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी , जिल्हा  महानगर सरचिटणीस दिलीपभाऊ महेश्वरी , सुनीलभाऊ माळी, ॲड. राजेश भाई गोयर, उपअध्यक्ष अकीलभाई पटेल, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे , अशोक सोनवणे, दिपक पाटील, सतिश चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.यावेळी अशोक सोनवणे, वाय. एस. महाजन यांच्या मनोगत व्यक्त केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!