Home क्राईम थेरोळे गावात अवैध दारू व हातभट्टीविरोधात मोठी कारवाई !

थेरोळे गावात अवैध दारू व हातभट्टीविरोधात मोठी कारवाई !

0
1

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील थेरोळे गावात अवैध दारू विक्री आणि हातभट्टीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या तक्रारी तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, विविध साहित्य आणि अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला.

 


Protected Content

Play sound