राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट जारी

परळी कोर्टाच्या आदेशानुसार अटकेची कारवाई शक्यता

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भोंगे प्रकरणावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून औरंगाबाद पोलिसांकडून कारवाई सुरु आहे . तरत दुसरीकडे गेल्या २००८ मधील दाखल गुन्ह्याखाली परळी कोर्टानेदेखील राज ठाकरेंच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढले आहे, त्यांमुळे राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेनंतर त्यांच्यावर दाखल गुन्ह्याखाली कारवाई सुरु आहे. त्यातच २००८ मध्ये दुकानावरील मराठी पाट्यांच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनांनंतर राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. यात आंदोलकांवर ठिकठिकाणी गुन्हे देखील दाखल आहेत.  त्यात २००८ मधील घटनेसंदर्भात दाखल गुन्ह्याखाली बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरन्ट काढले आहे. त्यासंदर्भात  मुंबई पोलिसांकडे न्यायालयाने पत्रव्यवहार देखील केला आहे.

२००८ च्या दाखल गुन्ह्याखाली जामीन घेत वेळोवेळी सुनावणीवेळी गैरहजर राहिले आहेत. तसेच १० फेब्रुवारी रोजी अटक वॉरन्ट काढत १३ दरम्यान कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते, त्यानंतरहि राज ठाकरे हजर झालेले नाहीत, त्यामुळे यामुळे परळी न्यायालायाने हे आदेश काढले आहेत.

तर दुसरीकडे यापूर्वीच दाखल गुन्हयात शिराळा न्यायालयाने देखील राज ठाकरेंच्या विरोधात  अटक वॉरन्ट काढले आहेत. त्यामुळे राज ठाकरे याच्या अडचणीत वाढ होण्यासह त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!