राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शताब्दी स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महावितरणचे जळगाव मंडळ कार्यालय येथे आज सकाळी १० वाजता बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमतर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन सभा घेण्यात आली.

सभेस उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, बहुजन फोरमचे परिमंडळ सचिव विजय सोनवणे, एस. ई ए. चे उपाध्यक्ष पराग चौधरी व कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. सर्वांनी १०० सेकंद स्थब्ध उभे राहून आदरांजली वाहिली व पुष अर्पण करून कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले.

सभेस योगेश जाधव, राहुल वडनेरे, सचिन जाधव, महेश अडकमोल, चरण पांढरे, नितीन रामकुवर, देवेश बाविस्कर सह मोठ्या संख्येने सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content