मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री जळगावात दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन मंत्र्यांसह जळगावात दाखल झाले असून ते प्रा. सोनवणे यांच्या घरच्या विवाहाला हजेरी लावणार आहेत.

आमदार सौ. लताताई सोनवणे तसेच माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्येचा आज विवाह असून नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत वन व सांस्कृती कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवर, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व खनिकर्म मंत्री ना. दादा भुसे हे देखील जळगावात आले आहेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांनी जळगाव विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

Protected Content