पिंप्राळा हुडको परिसरात विवाहितेला शिवीगाळ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथील २७ वर्षीय विवाहितेला जुन्या वादातून शिवीगाळ करून अश्लिल हावभाव करणाऱ्या तरूणावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको दुध फेडरेशन येथील २७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. ९ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात काम करत असतांना घरात कुणीही नव्हते. संशयित आरोपी सलमान शेख शाबीर (वय-३०) रा. पिंप्राळा जळगाव घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विवाहितेच्या पती व मुलांना शिवीगाळ करून धमकी दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सलमान शाबीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content