पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मॉकड्रील

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे आपत्कालीन अग्निशमन विभागाला तात्काळ संपर्क साधून माहिती कळवित शाळेत आग लागली असता कशा प्रकारे आपण परिस्थिती हाताळू शकतो.  या संदर्भात मॉकड्रील करण्यात आली.

आज गुरुवार, दि. १६ जून रोजी दुपारी पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे एव्यागेशन मॉकड्रील घेण्यात आले. यात शाळेत आग लागली असता कशा प्रकारे आपण परिस्थिती हाताळू शकतो. आपत्कालीन अग्निशमन विभागाला तात्काळ संपर्क साधून माहिती कळविणे संदर्भात विद्यार्थ्यांना मॉकड्रील देण्यात आले

आपत्कालीन परिस्थतीत कुणी विद्यार्थी जखमी झाला, बेशुद्ध झाला तर त्याला प्रथमोपचार व सी.पि.आर कसा द्यायचा. आग लागली असता विद्यार्थी छोट्या आगीवर फायर एन्स्टिगुशरने कसे नियंत्रण मिळवता येते. LPG गॅसला आग लागली असता त्यावर कसे नियंत्रण मिळवता येते. यावर डेमो दाखवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. याप्रसंगी पोदार शाळेचे प्राचार्य महाजन सर, जितेंद्र कापरे व इतर शिक्षक, शिक्षिका आणि शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा.अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे, फायमन अश्वजित घरडे, भारत बारी, तेजस जोशी, नितीन बारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Protected Content