Home Cities जळगाव विधानपरिषद निवडणुकीतून अनिल चौधरी यांची माघार, नंदकिशोर महाजन यांचा मार्ग मोकळा !

विधानपरिषद निवडणुकीतून अनिल चौधरी यांची माघार, नंदकिशोर महाजन यांचा मार्ग मोकळा !

0
268

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदानाच्या ऐन आधी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत यंदा मोठे नाट्य घडले. महायुतीत ही जागा आधी कुणाला सुटणार ? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. यात जागा भाजपला सुटून कुणालाही अपेक्षित नसणारे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली. तर उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी आपला अर्ज भरल्याने खळबळ उडाली. यामुळे मैदानात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि अपक्ष रेश्मा काळे असे उमेदवार उरले होते. यानंतर रेश्मा काळे यांनी जाहीर माघार घेतल्यानंतर तीन उमेदवार उरले. शेवटच्या टप्प्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यानंतर आज अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत माघारीची घोषणा केली.

आजच्या पत्रकार परिषदेत अनिल चौधरी यांच्या सोबत आ. किशोरआप्पा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी अनिल चौधरी यांनी आपल्याला आ. बच्चूभाऊ कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॉल येऊन त्यांनी महायुतीसाठी माघार घेण्याचे सुचविले. यानुसार आपण माघार घेत असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

अनिल चौधरी यांच्या माघारीमुळे आता रिंगणात फक्त नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे हे उरले आहेत. यामुळे नंदूभाऊ महाजन यांचा विजय जवळपास निश्चीत झाल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound