चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत देशाच्या जडणघडणीतील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव केला. देशाची एकात्मता व अखंडता अबाधित राखण्यासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे मनोगत या वेळी व्यक्त करण्यात आले.

स्व. इंदिरा गांधी यांनी आपल्या कणखर नेतृत्वातून जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे धाडसी निर्णय, दूरदृष्टी आणि देशसेवेप्रती असलेली निष्ठा भारतीय इतिहासात कायम स्मरणात राहील, अशा भावना या वेळी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या अभिवादन कार्यक्रमाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, मधुकर बाविस्कर, माजी शहराध्यक्ष के. डी. चौधरी, विक्रम पाटील, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे, अजबराव पाटील, जिल्हा सचिव संजीव सोनवणे, ॲड. एस. डी. पाटील, नगरसेवक रमाकांत ठाकूर, अमोल पाटील, किरण सोनवणे, दिलीप साळुंखे, जयवंतराव पाटील, किसान सेलचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे, प्रकाश चौधरी, देविदास साळुंखे, एम. एन. शिंदे, सुमित पाटील, माणिक पाटील, डॉ. रवींद्र पाटील, अशोक पाटील, देवानंद शिंदे, शांताराम लोहार, भरत पाटील, रमाकांत सोनवणे, दीपक चौधरी, इलियास पटेल, अकिल शेख, नितीन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



