अनोख्या पध्दतीत गुलाबराव देवकरांचा वाढदिवस साजरा

0
शेअर करा !

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव प्रतिनिधी । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस येथे अतिशय नाविन्यपूण पध्दतीत साजरा करण्यात आला.

गुलाबराव देवकर यांनी आधीच आपला वाढदिवस दुष्काळामुळे साध्या पध्दतीत साजरा करण्यात यावा. तसेच विविध जनहितार्थ उपक्रम राबविण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले होते. या अनुषंगाने पिंप्री येथील ईश्‍वर पितांबर धोबी यांनी स्वखर्चाने येथील १५३ शालेय विद्यार्थ्यांना बुट आणि मोज्यांचे वाटप केले. गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले. तर सतीशचंद्र बाहेती यांनी शाळेला ई-लर्नींग किट प्रदान केले. या कार्यक्रमाला सरपंच योगिता सूर्यवंशी, माजी सरपंच रामनाथ पवार, सुरेश धोबी, घनश्याम चौधरी, सुदाम बडगुजर, संतोष पांडे, संभाजी कंखरे, देवानंद पाटील, रमेश दोडे, जितेंद्र साळुंखे, मनोज पांडे, बालू शर्मा, बाबूलाल बडगुजर, मनोज शर्मा, सुरेश मोहकर, मोहन शिंदे, शिवा महाजन, संजय ठाकूर, शिवाजी बडगुजर, विजय सूर्यवंशी, भगवान लोखंडे, प्रकाश धनगर, दगा धोबी, शांताराम मोहकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!