लघू पाटबंधारे विभागातील लाचखोर लिपीकास अटक

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव लघू पाटबंधारे विभागातील लिपीकाला लाभ क्षेत्राचा दाखला देण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेतांना धुळे लाचलुचपत विभागाने आज दुपारी रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार यांना लाघू पाटबंधारे लाभ क्षेत्राचा दाखला हवा होता. यासाठी चाळीगाव लघू पाटबंधारे विभागात जावून चौकशी केली. विभागातील क्लर्क सुरेश बेनीराम वाणी (वय-५४) रा. चाळीसगाव  यांना भेटले. दाखल्यासाठी आपल्याला ५०० रूपयांची लाचेची मागणी वाणी यांनी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात हा सापळा रचून पथकाने आज शुक्रवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास सापळा रचून लिपीक सोनवणे हा दाखल्यासाठी ५०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर लघू पाटबंधारे विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई

धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात राजन कदम,कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी,भुषण खलानेकर,भूषण शेटे, चालक सुधीर मोरे यांनी कारवाई केली.

Protected Content