भडगावातील सर्व दुकानदार व विक्रेत्यांची होणार कोरोना चाचणी

भडगाव प्रतिनिधी । शहरातील सर्व दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांची कोरोना चाचणी होणार असून सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापार्‍यांची बैठक नगर परिषद सभागृहात बैठक घेण्यात आली. त्या वेळी मुख्याधिकारी विकास नवाळे म्हणाले की, सर्व दुकानदारांनी तीन ते चार दिवसात कोरोनाची शासकीय चाचणी करून घ्यावी. जेणे करून व्यवसाय करणे सर्वांना सोयीचे होईल. तसेच मास्क लावल्याशिवाय कुणालाही वस्तू देऊ नका. अशा व्यक्तीला वस्तू देताना आढळले तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येईल.

मुख्याधिकारी पुढे म्हणाले की, दुकानदार पॉझिटिव्ह आढळल्यास त्यास दुकान बंद ठेवण्याची गरज नाही. पर्यायी व्यक्ती दुकान सुरू ठेवू शकतो. आगामी तीन ते चार दिवसात सर्व व्यावसायिकांची कोरोना चाचणी होणार असून उर्वरित व्यावसायिकांनी स्वतः चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले. दुकानदारांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील मुख्याधिकार्‍यांनी केले.

Protected Content