जळगावात रेड स्वस्तिकतर्फे प्रथमच बहुविकलांगांसाठी मोफत तपासणी शिबीर

जळगाव प्रतिनिधी । रेड स्वस्तिक, मानव कल्याण केंद्र दहिसर, अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि छत्रपती शिवाजी ब्रिगेड यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जळगावात प्रथमच कुबड तथा बहुविकलांग रूग्णांची मोफत पुर्व तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जी मुले जन्मत: कुबड घेऊन जन्माला येतात. तसेच ज्यांना जन्मता विकलांगता असते विशेष म्हणजे पायाच्या पंज्यांचे अपंगत्व एक हात, एक पाय, अश्या बालकाच्या वयोमानानुसार नैसर्गिक वाढ न होणे, मान कायम तिरपी असणे, सामान्यांसारखे बसता न येणे व चालता न येणे, हातापायाची बोट चिपकलेली असणे, पायात पाय घालून चालणे टाच उंचावून चालणे, मांडी घालून बसता न येणे अशा प्रकारच्या रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करून त्यांचेवर मोफत शस्त्रक्रियेच्या उपक्रमाची सुरुवात २३ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे करण्यात येणार आहे.

जळगाव शहरातनंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर हा मानवतावादी आरोग्यदायी उपक्रम राबवून एकही कुबड असलेला वा बहुविकलांग (सेरीब्रल पाल्सी) रुग्ण राहणार नाही तो सक्षमतेने जीवन जगेल. यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती रेड स्वस्तिकचे राष्ट्रीयसह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, राज्य जनसंपर्क संचालक रोशन मराठे, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेशदादा झाल्टे, राष्ट्रीय संचालक डॉ. धनजय बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी रेड स्वस्तिकच्या रायसोनी नगर भुसावळ रोड येथील कार्यालयात नोंदणी करण्यात येणार असून त्यासाठी मोबाईल क्रमांक 9730089898, 9822153233, 9823782323 या क्रमांकाच्या व्हाट्सअपवर फोटो त रिपोर्टसह संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
२३ फेब्रुवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह टेलिफोन ऑफिसच्या मागे जळगाव येथे करण्यात आले. या उपक्रमासाठी सरदार वल्लभभाई पटेल सेवाभावी संस्थेचे विशेष सहकार्य लाभत आहे. या शिबिराचा लाभ कुबड व विकलांगांनी घेऊन सक्षम व्हावे व सामाजिक प्रवाहात यावे, असे आवाहन जिल्हा सचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. दीपक पाटील, ॲड. एस.एस.पाटील, महानगरप्रमुख संजय काळे, दिलीप गवळी, शशिकांत पांडे, डॉ.गणेश पाटील, ॲड. महेश भोकरीकर, यश पांडे, डॉ. प्रमोद आमोदकर, नंदू रायगडे, शेखर पाटील, किरण देखने, अर्जुन जगताप, आनंदराव मराठे, किरण बोरसे, संजय आवटे, आनंदा साळुखे, संदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले आहे. विशेष सहकार्य शाह महाराज रुग्णालय यांचे लाभत आहे.

Protected Content