पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आदित्य बिर्ला गृपतर्फे शिष्यवृत्ती

पाचोरा प्रतिनिधी । शासनाने कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांसाठी एका पालकांसाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याची योजना यापूर्वीच जाहीर केली आहे. शासनाचे पाठोपाठ आता आदित्य बिर्ला गृप या समाजसेवी संस्थेतर्फे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ हजार व नवीन ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना हाती घेतली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी (दि. ३१) पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दिली आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने मोठा धुमाकूळ घातला आहे. पाचोरा तालुक्यात दोन वर्षात ४ हजार ७९६ नागरीकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती या पैकी २०० नागरीकांना कोरोना व्हायरस मुळे जीव गमवावा लागला आहे,यात तालुक्यात ४ पाल्यांचे आई व वडील असे दोन्ही पालक गमावले आहेत तर ८४ पाल्यांनी आई किंवा वडील असे एक पालक गमावले आहे. यात बांबरुड (राणीचे) येथील दोन पाल्य व वडगांव मुलाने येथील दोन पाल्यांचा आई आणि वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या मधे समावेश आहे.

शासनाने दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांसाठी एका पालकांसाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याची योजना यापूर्वीच जाहीर केली आहे. शासनाचे पाठोपाठ आता आदित्य बिर्ला गृप या समाजसेवी संस्थेने पाल्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण अधूरे राहू नये व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून कोरोना व्हायरस काळात ज्या पालकांचे आई वडीलांचे निधन झाले आहेत व ते अठरा वर्षांच्या आत असून शिक्षण घेत आहेत. अशा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ हजार व नवीन ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना हाती घेतली आहे,या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ जानेवारी २०२२ ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दिली आहे.

कोरोना व्हायरस काळा ज्या पालकांचे आई व वडील असे दोन्ही पालक गमावले असतील त्यांना शासनाकडून पाच लाख रुपये अनुदान देण्याची योजना हाती घेतली आहे. पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे दोन पाल्याचे तर वडगाव (मुलाने) येथे दोन पाल्याचे आई व वडील असे दोन्ही पालक गमावले आहे यात वडगाव मुलाने येथील दोन्ही पाल्यांना पाच लाख रुपये मदत यापूर्वीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर बांबरुड राणीचे येथील दोन पाल्यांचे प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय कोरोना व्हायरस काळात पत्नी किंवा पतीचे निधन झाले आहेत व या पैकी जे हयात आहेत त्या वारसास ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे,तर उर्वरित महिला हयात असल्यास त्यांना संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करून योजना एक हजार रुपये महिना देण्यांचे काम तहसिल कार्यालयात द्वारे सुरू झाले आहे. आई व वडील असे दोन्ही पालक गमावले असेल तर घरातील अज्ञान वारसांना सज्ञान होईपर्यंत दरमहा १ हजार १०० रुपये देण्याची योजना हाती घेण्यात आली असून या साठी तालुका स्तरावरील तहसिलदार हे अध्यक्ष, महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एन. जी. ओ. संस्थेच्या दोन महिला अशासकीय सदस्य यांनी निवड समितीत आहे,पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे नावे अॉनलाईन अर्ज दाखल करावयाचा आहे.

मदत मिळण्यासाठी द्यावयाची कागदपत्रे

कोरोना व्हायरस काळात ज्या नागरीकांचे निधन झाले आहे त्यांचे वारसांना मदत मिळण्यासाठी कोरोना व्हायरसचा रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, मयताचे आधार कार्ड, वारसदाराचे आधार कार्ड व रेशनकार्ड जोडने आवश्यक आहे.

जीवंत महिलेस दाखविले मयत

पाचोरा तालुक्यात कोरोना व्हायरस काळात आरोग्य विभागाकडे ८४ नागरीकांच्या मृत्यूची नोंद असून यात अद्याप २२ नागरीकांची यादी घरोघरी जाऊन सर्वे करून करण्यात आली आहे,यात १७ नागरीकांचे भेटी नंतर फॉर्म भरले आहे  १ नागरीकाचा मृत्यूचे दाखले उपलब्ध झाले नाहित, ३ जनांशी संपर्क होत नाही तर कुऱ्हाड येथील श्रीमती नर्मदाबाई साहेबराव देशमुख ह्या महिलेस कोरोना व्हायरसची लागण झाल्यांनतर ती त्यातून वाचलेली असतांना आरोग्य विभागाच्या यादीत तीला मयत दाखविले आहे.

 

Protected Content