‘त्या’ अधिकाऱ्यांकडून माझ्या जीवाला धोका – पाटोळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंचायत समिती पारोळा येथील गटविकास अधिकाऱ्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना निलंबित (बडतर्फ) करून जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, असे निवेदन विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास दि. १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिनी राज्यपाल यांच्या राजभवन मुंबई येथे आत्मदहन करण्याचा इशारा सुरेश पाटोळे यांनी दिला आहे. निवेदन संबंधित खात्यांना देण्यात आले.

जिल्ह्यातील पारोळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम 2005 अंतर्गत ग्रामपंचायत टोळी सरपंच यांच्या आदेशाने ग्रामरोजगार सेवक सुरेश पाटोळे हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. १ ऑगस्ट रोजी पंचायत समिती पारोळा येथे गेले होते. यावेळी प्रोसिडिंग नक्कल व कव्हरिंग लेटर लिहित असतांना अचानकपणे गटविकास अधिकारी विजय लोंढे हे माझ्याजवळ आले. अति क्रोधित स्वभावाने मारण्याचे हावभाव करत धमकीने सांगुन ऊठ, ऊठ निघ इथुन, निघ, निघ पंचायत समितीला यायचे नाही, परत इथे दिसला तर तुझ्यावर सरकारी कोणताही गुन्हा दाखल करेल आणि याविषयी कुठे तक्रार केली तर खंडणीचा गुन्हा दाखल करेल, आणि कोणाच्याही चारचाकी वाहनाने तुझा अपघात करुण जीवे ठार मारेल, अशा प्रकारची जीवे ठार मारण्याची धमकी विजय लोंढे यांनी दिलेली आहे.

तसेच ग्रामपंचायत टोळी यांना खोट्या तक्रारी करण्याचे सांगुन ग्रामरोजगार सेवक पदावरुन कमी करण्याचे नियोजन मागील चार महिन्यांपासुन गटविकास अधिकारी यांचे चालु आहे. वेळोवेळी अन्याय होत आलेला आहे. त्यामुळे बी.डी.ओ. यांच्यामुळे माझ्या जिवाला धोका आहे. म्हणुन सुरेश पाटोळे यांनी दि. १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राज्यपाल यांच्या राजभवन मुंबई येथे आत्मदहन करणार आहे. गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना निलंबन (बडतर्फ) करुन जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात यावे, असे निवेदन जिल्हाधिकारी व संबंधित खात्याला देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल प्रकाश देवरे, सामाजिक कार्येकर्ते राहल सरदार, सुरेश पाटोळे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियन, चंद्रकांत सोनवणे माहिती अधिकार कार्यकर्ता, राहुल पाटील शेतकरी संघटनेचे व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content