Home Cities जळगाव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा रद्द

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा रद्द

0
42

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने ९ आणि १० ऑगस्ट रोजीचा नियोजित जिल्हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहे. मुंबईसह बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. पहिला टप्प्यात मराठवाडा, दुसरा टप्पा कोकण आणि तिसरा टप्प उत्तर महाराष्ट्र असा दौरा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान पहिला आणि टप्पा मध्ये मराठवाडा आणि कोकण येथे आदित्य ठाकरे यांनी दौरे केले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात होता. यात जळगाव जिल्ह्यात ८ आणि ९ ऑगस्ट रोजी धरणगाव आणि पाचोरा मतदार संघात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार होते. परंतू आदित्य ठाकरे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा नियोजित दोन दिवसीय जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद दौऱ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनाचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound